अकोला एटीएसने पीएफआयच्या खजीनदाराला जळगावातून केली अटक

संघटनेच्या संबंधावरून इतर दोघांची चौकशी;कारवाईने खळबळ
अकोला एटीएसने पीएफआयच्या खजीनदाराला जळगावातून केली अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पीएफआय संघटनेच्या (PFI Association) संदर्भात एनआएने (N. A) देशभरात छापेमारी (Raid begins)सुरू केली असून राज्यातून (state) आतापर्यंत 20 जणांना अटक (arrested) करण्यात आली असतानाच जळगावच्या मेहरुणमध्येही (Mehrun) एकाला ताब्यात (Detain one)घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (32, रा.रेहमान गंजवरुन अपार्टमेंट, जालना) असे ताब्यातील संशयीताचे नाव असून त्यास ताब्यात घेतल्याबाबत पोलीस दप्तरी रीतसर नोंदही करण्यात आली आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला संशयित पीएफआय संघटनेचा खजीनदार असल्याची माहिती मिळाली आहे.

अकोला एटीएसने गुरूवारी पहाटेच्या सुमारास जळगावमधील मेहरूण परीसरातून तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. तर जालन्याच्या अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (32, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसापासून जळगावात लपून बसलेला होता व तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान अब्दुल हद्दी यास एटीएस पथकाने ताब्यात घेत औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात दहशतवादी फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आणि लोकांना संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या लोकांवर छापे टाकले जात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com