Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशबिकानेर एक्स्प्रेसच्या अपघातात मृतांची संख्या नऊवर, ३७ जखमी

बिकानेर एक्स्प्रेसच्या अपघातात मृतांची संख्या नऊवर, ३७ जखमी

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता १२ डब्बे रेल्वे रुळावरुन (Train Accident)घसरल्याने मोठा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या ९ झाली आहे. तसेच ३७ प्रवाशी जखमी आहे. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहचले आहे.

इतर जखमींवर जलपैगुडी आणि मैनापुरीमध्ये उपचार सुरु आहेत. जमिनीपासूनवर आलेल्या रुळांच्या बाजूला अनेक डबे पडले असून, बचावकार्य करणारे स्वयंसेवक त्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

रेल्वे पोलिस प्रशासनासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. अपघातातील जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढल्यानंतर स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

अपघातातच्या माहितीसाठी प्रशासनाने दोन हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. रेल्वे हेल्पलाइनच्या ०३६१२७३१६२२ आणि ०३६१२७३१६२३ या दोन क्रमांकांवर कॉल करून माहिती मिळवता येईल.

रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

30-40 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून सिलीगुडीहून एक रिलीफ ट्रेन पाठवली जात आहे. तसेच येथील वैद्यकीय महाविद्यालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

रेल्वे मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची, तर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. अपघातात शुक्रवार सकाळपर्यंत नऊ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

केरळमध्ये पावसाचं थैमान; VIDEO पाहून उडेल थरकाप

- Advertisment -

ताज्या बातम्या