शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati Shivaji maharaj) यांचा चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांचे काल निधन झाले. त्यांनी नुकतेच वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केले होते...

आज त्यांच्या अस्थींचे रामकुंड (Ramkund) येथे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. बाबासाहेबांचे स्नेही साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानचे विश्वस्त मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते विसर्जन झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केल‍ा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com