Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त

जिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाच्या (District Milk Union) चुरशीच्या निवडणुकीत (election) भाजपा-शिंदे गट प्रणित (BJP-Shinde Group Pranith) शेतकरी विकास पॅनलने (Farmer Development Panel) 20 पैकी 16 जागांवर विजय (winning) मिळवून महाविकास आघाडी प्रणित (Maha Vikas Aghadi Pranit) सहकार पॅनलचा (Cooperative Panel) अक्षरश: धुव्वा उडविला. या निवडणुकीत मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी 76 मतांनी दारूण पराभव केला. एकूणच गेल्या सात वर्षापासूनचे दूध संघातील खडसे पर्व आजच्या निकालानंतर संपले आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 19 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. शनिवारी मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उमेदवारी केली. तसेच शेतकरी विकास पॅनलची धुरा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती.

तर महाविकास आघाडी प्रणित पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पाचोरा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आ. दिलीप वाघ हे शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आधीच बिनविरोध झाले होते. त्यामुळे 19 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण आणि आ. एकनाथराव खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

दूध संघ निवडणुकीत विजय ; मुक्ताईनगरात जल्लोष…

शेतकरी विकास 16 तर सहकार पॅनल 4 जागांवर विजयी

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर सहकार पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. दूध संघातील पराभव हा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा दूध संघावर सहकार पॅनलचा पराभव करीत शेतकरी विकास पॅनलने झेंडा फडकविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या