सहाय्यक अधीक्षक अभियंत्यास ठेकेदाराकडून मारहाण

सहाय्यक अधीक्षक अभियंत्यास ठेकेदाराकडून मारहाण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उंटवाडी येथील सिचन भवन कार्यालयातील ( Irrigation Office)सहायक अधीक्षक अभियंत्यास ठेकेदाराने शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station )दोघा सशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत विश्वास देवरे, प्रशांत धात्रक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान थेट अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाउन मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी शासकीय ठेकेदारकडून मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संशयिताविरोधात लघू पाटबंधारे विभागातील फिर्यादी सहायक अधिक्षक अभियंता प्रदीप लोधे यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात पाच वाजता बसलेले असताना, संशयित प्रशांत देवरे व प्रशांत धात्रक या दोघांनी जबरदस्तीने फिर्यादी लोधे यांच्या कार्यालयात घुसून महिला कार्यालयातील लिपीक माळी व फिर्यादी लोधे यांना शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

तसेच या दोघांनी लोधे यांच्या कानशीलात मारुन त्यांची गच्ची धरुन खूर्चीवर दाबून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. लोधे करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला. दरम्यान या घटनेनंतर दोघा संशयितांनी तेथून पळ काढला. याप्रकारणी सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com