Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मोठा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी (MLA) बंड केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. शिंदेंच्या या बंडामुळे तत्कालीन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वतीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरुवातीला जे १६ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते त्यांच्यावर अपात्रतेची (Disqualification) कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

NCP Crisis : शरद पवार यांची आज येवल्यात पहिली जाहीर सभा, वर्मावर बोट ठेवणाऱ्या भुजबळांना काय उत्तर देणार?

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला लवकरच वेग येणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना येत्या दोन ते तीन दिवसांत नोटीसा बजावणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र? याचा फैसला लवकरच येण्याची शक्यता आहे.

डॉ. प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे याबाबतचे सर्व अधिकार दिलेले असताना अध्यक्षांकडून यासंदर्भात कोणत्याची हालचाली करण्यात आल्या नाहीत. तसेच आजचे महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय आणखी लांबणीवर जाऊ शकतो. त्यामुळे अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांना तशा पद्धतीचे निर्देश देण्यात यावेत, अशा आशयाची याचिका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या