Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडणार?; राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

विधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडणार?; राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | Mumbai

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly speaker election) आज अर्ज भरायचा असतांनाच राज्य सरकारला (State Govt) मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.

- Advertisement -

नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या…

या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.

‘या’ ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

काय म्हणाले राज्यपाल?

विधानसभा अध्यपदासाठी महाविकास आघाडी सरकार आवाजी पद्धतीने मतदान घेणार आहे. यासाठी सरकारने एकमताने निवडणुकीचा नियम बदलला. गुप्तपणे मतदान घेण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र, त्याला डावलून राज्य सरकारने आवाजी मतदान घेणार असल्याचं सांगितलं. याला राज्यपालांनी विरोध दर्शवल्याचं चित्र आहे.

सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

निवडणुकीची प्रक्रिया डावलून आवाजी पद्धतीचं अवलंबन म्हणजे घटनाबाह्य कृती असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकार अशा प्रकारे निवडणूक घेण्याची प्रक्रिया बदलू शकत नाही. त्यामुळे आता राज्यपालांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पेच कसा सोडवणार, याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण… १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण : ‘या’ तारखेपासून CoWIN वर करता येणार नोंदणी

- Advertisment -

ताज्या बातम्या