Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Election of Assembly Speaker ) व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकी संदर्भातील प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

राज्यपालांच्या या निर्णयामुळे सुरू असलेल्या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही असे स्पष्ट होत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळे आताच निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नाही, असे राज्यपालांनी हा प्रस्ताव फेटाळताना सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या