Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुनगंटीवारांची सभागृहात चौफेर फटकेबाजी

मुनगंटीवारांची सभागृहात चौफेर फटकेबाजी

मुंबई

माझे कुटुंब, माझी जबाबदारी… माझे पेपर माझी मुलाखत.. माझे पोलीस, माझा एफआयआर.. अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. आपल्या भाषणात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांनाही लक्ष केले.

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. मंगळवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्य सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी चौफेर टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, ‘आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

अजित पवार म्हणतात…आव्हान स्वीकारले

अजित पवार म्हणाले की, ‘तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, मला पाडूनच दाखवा’ असा खुमासदार टोला लगावला. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली. पण, अजितदादांच्या खुमासदार विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनी गुगली टाकली. ‘मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरचा आहे. हे आम्ही करून दाखवले आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे’ असं मुनगंटीवार म्हणाले असता पुन्हा सभागृहात एकच हश्शा पिकली.

मुख्यमंत्र्यांना केले लक्ष

तसंच ‘राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटले आहे’ असा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

‘मुख्यमंत्री, अजित पवार आणि माझा व देवेंद्र फडणवीस यांचा जन्म जुलै महिन्यातील आहे, जुलै महिन्यातील व्यक्तिमत्वाचे गुण मी पाहिले. त्यात एक वाक्य लिहलंय. आई- वडिलांना त्रास होईल असा कोणताही व्यवहार जुलैमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती करत नाही. तेव्हा माझ्यासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. त्याचवेळी मी बाळासाहेब यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांची भाषणं ऐकली,’ असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या