हिवाळी अधिवेशन : वीज बिलावरुन भाजप आक्रमक, केला सभात्याग

हिवाळी अधिवेशन : वीज बिलावरुन भाजप आक्रमक, केला सभात्याग

मुंबई:

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा (assembly session) दुसरा दिवस आहे. विधान परिषदमध्ये (vidhan parishad)विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपने (bjp)आज पाच मिनिटांसाठी सभात्याग केला. विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिलावरुन (electricity bill)प्रश्न विचारले असता राज्य सरकारकडून (maharashtra government)उत्तराची टाळाटाळ होत असल्याने भाजपकडून सभात्याग करण्यात आला.

हिवाळी अधिवेशन : वीज बिलावरुन भाजप आक्रमक, केला सभात्याग
कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

विधान परिषदेत वीज बिलावरुन विरोधकांनी सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले. हे सरकार शेतकरी विरोधी असून, शेतकऱ्यांच्या माथी 60-70 हजारांचे वीजबिल देत आहेत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम हे सरकार करत असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यास चोर म्हटले, भाजपचा सभात्याग

विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडताना सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना वीज जोडण्या आणि बोगस बिलं पाठवल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीची परवड होते असून पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारच्या नियमांमुळे पैसे उभारताना मर्यादा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री उत्तर देत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जळगाव मधल्या शेतकऱ्याला वीज जोडणी दिली नसताना 73 हजार रुपये बिल दिले गेले असल्याचे म्हटले. त्याच वेळी सत्ताधारी बकावरून चोरून वीज घेतली जाते त्याचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. याच वाक्यावरून विरोधक आक्रमक झाले. सत्ताधारी आमदाराने शेतकऱ्यांना चोर म्हणाले म्हणून गोंधळ घातला आणि सभात्याग केला.

हिवाळी अधिवेशन : वीज बिलावरुन भाजप आक्रमक, केला सभात्याग
S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

परिवहन मंत्री अनिल परब (Shivsena Minister Anil Parab) आणि भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्यामध्ये सभागृहातच हमरीतुमरी झालेली पाहायला मिळाली. नितेश राणेंच्या विरोधात अनिल परब अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत होते. त्यात मध्येच नितेश राणे बोलले. त्यानंतर अनिल परबांचा आवाज चढला आणि त्यांनी नितेश राणेंना सुनावले. परब म्हणाले, मला मंगलप्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना उत्तर आधी देतो. तुम्ही तुमच्या जागेवर जा. जिथे जागा आहे तिथे जाऊन बसा. त्यानंतर नितेश राणे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अध्यक्षांनी हस्तक्षेप करत नितेश राणेंना जागेवर बसण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंचा सीट क्रमांक सांगा, अशी विचारणा अध्यक्षांना केली. सीट नंबर तुम्ही नाहीतर आम्ही देतो, असं फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.