यंदा 'या' राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; वाचा सविस्तर

यंदा 'या' राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

२०२२ या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) निवडणुका पार पडल्या. यात गुजरातमध्ये भाजपने (BJP) पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. यानंतर आता २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे...

२०२३ मध्ये मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालँड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका (Elections) होणार आहेत. या ९ राज्यांपैकी ६ राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तसेच तेलंगणामध्ये भारतीय राष्ट्र समितीचे (पूर्वीचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती) सरकार आहे.

दरम्यान, २०२३ मध्ये देशभरात ९ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) सेमीफायनल असणार आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे लक्ष या ९ राज्यांकडे असणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी (Congress) देखील ही निवडणूक भविष्यातील वाटचालीसाठी महत्वाची असणार आहे. त्यासाठी आतापासूनच दोन्ही पक्षांनी संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com