Sunday, April 28, 2024
HomeनाशिकNashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

पेठ | Peth

गेल्या आठवड्यापूर्वी तालुक्यातील अदिवासी विकास प्रकल्पाच्या भुवन आश्रमशाळेतील वसतीगृहात अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधीक्षकाने पलायन केले आहे. आदिवासी विकास विभागाने याप्रकरणी दोन अधीक्षकांना निलंबित केले आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय आश्रमशाळा भुवन येथे इ. ७ वीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीस वार्षिक परिक्षा संपल्यानंतर मुलांच्या वसतीगृहाचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांनी मुलींच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर बोलावून विद्यार्थिनीवर अत्याचार केले.

सुप्रिया सुळे म्हणतात, १५ दिवसांत दिल्ली अन् महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट…

आश्रमशाळेच्या परिक्षा संपल्याने पिडीतेची आई तिला घेण्यासाठी आश्रमशाळेत आली. यावेळी पिडीतेने आपल्या आईला आपबिती सांगितली. याप्रकरणी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

संजय राऊतांचा अजित पवारांबाबत मोठा दावा; म्हणाले, भाजपकडून त्यांच्या…

याबाबत अदिवासी विकास विभागाने नेमलेल्या सहा महिला सदस्सीय विशाखा समितीने भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या समितीने दिलेल्या अहवालानुसार अधीक्षक राहुल तायडे आणि महिला अधीक्षक प्रियंका उके या दोषी आढळल्या. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या