Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यागट-गण आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा; धाकधूक वाढली

गट-गण आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा; धाकधूक वाढली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद गट ( Zilaa Parishad Gat )व पंचायत समितीच्या गणांसाठी ( Grampanchayat Gan ) 13 जुलै रोजी आरक्षण सोडत ( Reservation Draw ) काढली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.7) आरक्षण सोडतीची सूचना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या गटासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तर, गणासाठी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात ही सोडत निघणार आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषद गटांसाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार हे तालुकास्तरावर बुधवारी (दि.13) सकाळी 11 वा. सभा घेतील. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (महिलांसाठी आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयच्या जागा निश्चित करण्यात येतील.

आरक्षण निश्चित झाल्यानंतर आरक्षणाचे प्रारूप 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर 15 जुलै ते 21 जुलै या काळात जिल्हा परिषद गटासाठी जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणांसाठी संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करता येतील.

बुधवारी (दि.13) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद गटांसाठी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरक्षण सोडत काढली जाईल.

याच दिवशी सकाळी 11 वा. पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार कार्यालय नाशिक, पंचायत समिती सभागृह दिंडोरी, मीटिंग हॉल तहसीलदार कार्यालय त्रंबकेश्वर, पंचायत समिती सभागृह इगतपुरी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चांदवड, कळवण पंचायत समितीचे सभागृहाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नांदगाव तहसीलदार कार्यालय, येवला तहसील कार्यालय, बागलाण पंचायत समितीचे सभागृह, देवळा नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, तहसील कार्यालय पेठ, पंचायत समिती सभागृह सुरगाणा, मीटिंग हॉल तहसील कार्यालय मालेगाव, निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा हॉल उपबाजार निफाड,तहसील कार्यालय सिन्नर या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी सभा होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या