'अस्मिता' योजना पुन्हा सुरु करणार - ग्रामविकास मंत्री महाजन

'अस्मिता' योजना पुन्हा सुरु करणार - ग्रामविकास मंत्री महाजन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात महिलांसाठी राबविण्यात आलेल्या अस्मिता योजनेची( Asmita Yojana) व्याप्ती वाढवून लवकरच ही योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना एक रूपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

भाजपच्या नमिता मुंदडा यांनी अस्मिता योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. त्यावर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी घोषणा केली. अस्मिता योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला आणि किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार असून या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, सुलभा खोडके, भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर, शिवसेनेच्या यामिनी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ, राजेश टोपे यांनी उपप्रश्न विचारले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com