Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रDrugs Case : ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणाले, पार्टीचे निमंत्रण होते, पण...

Drugs Case : ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणाले, पार्टीचे निमंत्रण होते, पण…

मुंबई:

मुंबईतील ड्रग्ज पार्टी (Drugs Case) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. आर्यन खानचे (Aryan Khan)नाव यात आल्यानंतर रोज नवनवीन खुलासे होत आहे. प्रत्येकजण एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करतोय. आता या प्रकणावर पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh)यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीत मला काशिफ खानकडून निमंत्रण असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.

- Advertisement -

ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

अस्लम शेख म्हणाले, ‘माझ्याकडे बंदरे विकास खाते आहे. मला जर या ड्रग्ज पार्टीची माहिती असती मी स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली असती. क्रुझला माझ्या विभागानं परवानगी दिलेली नव्हती. ते राज्य सरकारचं काम नसून त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळते.

काशिफ खानला मी ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावा.

मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. परंतु प्रत्येक ठिकाणी मी जात नाही. या ठिकाणी मी गेलो नसल्यामुळे त्याची माहिती मी घेतली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या