Asia Cup 2022 : अखेर भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख ठरली; 'असे' आहे वेळापत्रक

Asia Cup 2022 : अखेर भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची तारीख ठरली; 'असे' आहे वेळापत्रक

मुंबई । Mumbai

भारतीय संघ (Indian team) सध्या वेस्टइंडिज (West Indies) दौऱ्यावर असून त्यानंतर आशिया चषक (Asia Cup ) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धाी असणाऱ्या पाकिस्तानसोबत (Pakistan) होणार असून याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार असून या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक (Schedule) आज जाहीर करण्यात आले आहे...

या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात दुबई (dubai) येथे हायव्होल्टेज सामना होणार आहे. तर ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने आशिया कपही टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा येणार आहे. याआधी आशिया कपचे आयोजन श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) होणार होते, मात्र श्रीलंकेतली सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बघता आशिया कप युएईमध्ये (UAE) खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) घेतला आहे.

असे आहे वेळापत्रक

आशिया चषक स्पर्धेत भारत (India) पाकिस्तान (Pakistan) आणि क्वालिफायर संघ अ गटामध्ये आहेत. तर श्रीलंका (Srilanka) अफगाणिस्तान (Afghanistan) आणि बांगलादेश (Bangladesh) हे संघ ब गटामध्ये आहेत. याशिवाय ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. तसेच आशिया कपमध्ये पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-४ च्या संघांचे सामने ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होईल. तर अंतिम सामना ११ सप्टेंबर खेळविण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com