Asia Cup 2022 : आज भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

Asia Cup 2022 : आज भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

नवी दिल्ली | New Delhi

कालपासून आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. दुबई (Dubai) येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता हा सामना खेळविण्यात येणार आहे...

याआधी आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) २०२१ च्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला होता. आता या पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ डावपेचांसह मैदानात उतरणार आहे.

भारताचे प्रमुख गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्यातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आशिया चषकात त्याला ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.

तसेच भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त भुवनेश्वर कुमारसह (Bhuvneshwar Kumar) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आर्षदिपसिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्यावर असणार आहे. तर फलंदाजीची भिस्त के. एल. राहुल (KL Rahul) रोहित शर्मासह (Rohit Sharma) मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव यांच्यावर असणार आहे. याशिवाय फिनिशरची भूमिका दिनेश कार्तिकसह (Dinesh Karthik) हार्दिक पांड्या, दीपक हुडा आणि रविंद्र जडेजावर राहील.

दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्याजागी मोहम्मद हॅन्सेन याला संधी मिळाली आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Captain Babar Azam) रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना फार मेहनत करावी लागणार आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात १३ वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने ८ व पाकिस्तानने ५ विजय मिळवले आहेत.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com