
दुबई | वृत्तसंस्था
दुबई इंटरनॅॅशनल स्टेडियमवर आज आशिया चषक २०२२ चा क्रिकेटचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. यात भारताच्या संघाने पाकिस्तानवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
भारताच्या संघाने नानेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मा ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाकडून सलामीला मोहमद रिजवान व बाबर आजम फलंदाजीस आले. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंघने बाबर आजमला झेलबाद करत अवघ्या १० धावांवर तंबूत पाठविले. पहील्या पाच षटकांंत ३० धावांवर एक गडी बाद अशी स्थिती पाकिस्तानच्या संघाची होती.
बाबर आजम नंतर फखर जमान फलंदाजीसाठी मैदानात आला .सहाव्या षटकात आवेशखानच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने फखर जमानला झेल बाद केले. फखर जमानने १० धावा केल्या. फखर जमान नंतर इफ्तिकार अहमद फलंदाजीस मैदानात आला. १० षटकात ६८ धावांवर २ गडी बाद अशी स्थिती पाकिस्तानच्या संघाची होती. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने इफ्तिकार अहमदला २८ धावांवर झेल बाद केले.सलामीला आलेल्या मोहमद रिजवानने ४२ चेंडूत ४३ धावा केल्या.आवेश खानने मोहमद रिजवानला झेल बाद केले. रवींद्र जडेजा ने आक्रमक खेळी करत २९ चेंडूत ३५ धावा केल्या.मोहमद नवाजने जडेजाला क्लीन बोल्ड केले.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने खुशदील शाहला अवघ्या २ धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. पाठोपाठ सूर्यकुमार यादवने असिफ अलीला नऊ धावांवर झेलबाद केले. मोहमद नवाज अवघ्या १ धाव संख्येवर झेल बाद होत माघारी परतला.पाठोपाठ भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शादाब खान १० धावांवर पायचीत झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर नसीम शहा पायचीत होत शून्यावर बाद झाला. अर्शदीप सिंघ ने शाहनवाझ दहानीला १० धावांवर क्लीन बोल्ड केले.पाकिस्तानच्या संघाने ९ गडी बाद १४७ धावा केल्या.
भारतीय संघाने १४८ धावांचे लक्ष पार करताना सलामीला कर्णधार रोहित शर्मा व के एल राहुल फलंदाजीस आले.पहिल्या षटकातच नसीम शाहने के एल राहुलला शून्यावर क्लीन बोल्ड केले. रोहित शर्माने १८ चेंडूत १२ धावा करत इफ्तिकार अहमद कडून झेल बाद झाला. विराट कोहलीने शानदार खेळी करत ३४ चेंडूत ३ चौकार व एक षटकार लगावत एकून ३५ धावा केल्या.मोहमद नवाजच्या गोलंदाजीवर इफ्तिकार अहमदने विराट कोहलीला झेल बाद केले. १० षटकात ३ गडी बाद ६३ धावा अशी धाव संख्या भारतीय संघाची होती. नसीम खानच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव १८ धावांवर बाद झाला.
हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ३३ धावा करत विजयी षटकार लगावत पाकिस्तानवर विजय मिळविला.