मुरुमटी । अशोक तांदळे

पेठ तालुक्याच्या दुर्गम भागात नदी- नाले, लहान - मोठ्या ओहळ, माळरानावरील धबधबे पावसाच्या जोरदार आगमनाने खळाळून वाहू लागले आहेत....

मात्र पर्यटकांना भुरळ घालणारे धबधबे पर्यटकांविना करोना काळात सुनेसुने वाटू लागले आहे. निसर्गाची हिरवी चादर, पांढरे शुभ्र धबधबे मन वेधून घेत आहे.

खडकाच्या झिरपणार्या पाण्यातून आणि दूरवर दिसणारे धबधबे आकर्षित करीत आहे. याचाच प्रत्यय खडकी, शिंगाळी आदींसह परिसरात येत आहे.

मात्र पेठ तालुक्याच्या विकासाबरोबर लहान -मोठ्या परिसरातील धबधबे यांचा विकास होण्याची गरज आहे.

या विकासाच्या माध्यमातून पर्यटन विकासाला दिलेल्या चालनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.