Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशंभर आश्रमशाळांचे रुपांतर होणार 'आदर्श आश्रमशाळेत'

शंभर आश्रमशाळांचे रुपांतर होणार ‘आदर्श आश्रमशाळेत’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासी विकास विभागातर्फे ( Tribal Development Department ) चालवल्या जाणार्‍या शासकीय आश्रमशाळांपैकी ( Government Ashram Schools ) 100 शाळांचे रुपांतर ‘आदर्श आश्रमशाळेत’ ( Aadarsha Aashram School ) होणार आहे, अशी माहिती आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे ( Tribal Development Commissioner Hiralal Sonawane )यांंनी दिली.

- Advertisement -

शिक्षण पद्धतीत अनेक नवनवीन बदल होत आहेत. विद्यार्थी हे उद्याचे सक्षम नागरिक आहेत. आधुनिक काळातील बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आणि शिक्षणातील नवे आयाम पोहोचविण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण 499 शासकीय आश्रमशाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण विकासामध्ये या आश्रमशाळांचे योगदान उल्लेखनीय आहे. विभागांतर्गत 30 प्रकल्प असून प्रत्येक प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असणार्‍या आश्रमशाळापैकी 25% आश्रमशाळाची निवड आदर्श आश्रमशाळा म्हणून करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प अधिकारी यांना पुढील निकषांचा आधार घेऊन त्यांच्या प्रकल्पातील आदर्श आश्रमशाळांची निवड करता येईल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठीसाठी आदर्श आश्रमशाळा विभागाकडून तयार करण्यात येणार आहेत. यातून निश्चितच भवितव्यासाठी प्रेरणा आणि दिशा मिळेल.

हिरालाल सोनवणे, आयुक्त

असे आहेत निकष

आदिवासी विकास विभागाच्या नावे किमान 5 हेक्टर जमीन असावी.

नवीन टाईप प्लॅनप्रमाणे शाळा इमारत व किमान एक स्वतंत्र वसतिगृह इमारत असावी.

आजूबाजूच्या परिसरातील आश्रमशाळेच्या तसेच इतर अशा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळेल या अनुषंगाने केंद्रस्थानी असलेल्या आणि एकाहून अधिक शाळा समायोजित करून एकच आदर्श शाळा होईल अशी असावी.

शक्यतो आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांचीच निवड करण्यात यावी.

चांगल्या दळणवळण सुविधा असलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात यावे.

शाळेच्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी व विजेची उपलब्धता आणि इंटरनेट सुविधा असावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या