अशोक लवासा
अशोक लवासा
मुख्य बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी का दिला राजीनामा ?

बिहार निवडणुकांपूर्वी राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा ashok-lavasa-resigns-as-election-commissioner

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली.

मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा (Ashok Lavasa Resigns) यांनी मंगलवार आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते फिलीपाईन्समधील आशियाई विकास बँकेचे (ADB-Asian Development Bank) व्हाइस प्रेसीडेंट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. बिहार निवडणुकांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. लवासा यांनी २३ जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला होता. ते हरियाना केडरचे १९८० च्या बँचचे अधिकारी आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com