Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर

आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

मुंबई :

ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल याची चर्चा सुरू होती. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो.

- Advertisement -

आपल्या जादूई आवाजाच्या जोरावर गेली कित्येक दशके रसिकांच्या मनावर आशा भोसले यांनी राज्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या