जिल्ह्यात करोना बाधितांचा चढता आलेख; काळजी घेण्याची आवाहन

जिल्ह्यात 1.70 लाख करोना चाचण्या
करोना
करोना

नाशिक । वैभव कातकाडे

जिल्ह्यात करोना विषाणूचा Corona नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा Omicron प्रसार सुरू झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या महिन्यात 27 डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली.

यामध्ये प्रामुख्याने 1 लाख 70 हजार 491 करोनाच्या चाचण्या Corona Test झाल्या आहेत. मध्यंतरी केमिस्टकडून करोना चाचणी किट घेऊन काही रुग्णांनी घरच्या घरी चाचणी केली आहे त्याबाबतची आकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ न शकल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करोना विषाणूचा हा व्हेरिएंट घातक नसला तरी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात 48 हजार 341 रुग्ण बाधित झाले आहेत तर 31 हजार 650 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

सध्या 17 हजार 072 रुग्ण उपचार घेत आहेत. या महिन्यात 46 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोना बाधितांचा आलेख सतत वाढ होताना दिसत आहे. तरी नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासनांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com