Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक : ओवैसींनी केले भाजपला टार्गेट; जिथे लव्ह जिहादचा कायदा...

नाशिक : ओवैसींनी केले भाजपला टार्गेट; जिथे लव्ह जिहादचा कायदा…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लव्ह आणि जिहाद दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणे याला लोक जिहाद समजतात, हे चूक आहे. भारताचे संविधान प्रत्येक पौढ नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो. जर कोणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करत असेल तर त्यावर दुसऱ्यांना त्रास काय? भाजपशासित राज्यात जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला, तो असंवैधानिक आहे, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशकात माध्यमांशी बोलताना दिली….

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, भाजपला प्रेमाचा एवढा राग का येतो? प्रत्येक गोष्टीला सांप्रदायिक रंग द्यायची गरज नाही. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे, त्यावर काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावर बोलायला तयार नाहीत.

मध्य प्रदेशने केलेल्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. लव्ह जिहादच्या बाता मारणाऱ्या भाजपा पक्षातील अनेकांनी धर्माच्या बाहेर जाऊन लग्न केलेले आहे. पण आपण कोणत्या विषयावर चर्चा करत राहायची. आज देशात बेरोजगारी हाच मोठा मुद्दा आहे.

महागाई सहा टक्क्याने वाढली आहे. बेरोजगारी आठ टक्क्यांवर आली आहे, जगात सर्वात जास्त बेरोजगारी आपल्याकडे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. हे सोडून जे लग्न करतायत त्यांच्यामध्ये तुम्ही का पडत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या