Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशराज्यात लसीचा तुटवडा : या ठिकाणची केंद्र बंद

राज्यात लसीचा तुटवडा : या ठिकाणची केंद्र बंद

मुंबई

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज कोराना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे. लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लस नसल्याने लसीकरण थांबवावे लागल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, पुणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथेही कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. आजचा दिवस कसाबसा जाईल, असे सांगण्यात येत आहे.

राज्यात सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या कोरोना लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारमधील काही नेते मंडळींकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. कोरोना लसींचा महाराष्ट्राला अपुरा पुरवठा होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अनेक जिल्ह्यात लशींचा खडखडाट

सातारा, सांगली, कोल्हापूर, गोंदियामध्ये लशींचा साठा संपला असून मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच साठा उरला आहे. जर लस पुरवठा झाला नाही तर लसीकरण मोहिम थांबेल. काही जिल्ह्यांमध्ये लसीअभावी लसीकरण केंद्र बंदही करण्यात आली आहेत.

साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरु होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. राज्यात तीन दिवसांचाच लसीचा साठा शिल्लक, असल्याचे आधीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.

पनवेल महानगरपालिकेला लसीचा पुरवठा होत नसल्याने आजपासून लसीकरण बंद करण्यात आले आहे. पनवेल शहरात दिवसाला २५०० पर्यंत लसीकरण करण्यात येते. मात्र कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा संपल्याने लसीकरण बंद झाले आहे. दुसरीकडे कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस १६मार्चला देण्यात आल्याने दुसरा डोस १६ एप्रिलपासून सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून पनवेल महानगरपालिकेस लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्राला १ कोटी डोस

महाराष्ट्राला आत्तापर्यंत करोना लसीचे १ कोटी ०६ लाख १९ हजार १९० डोस पुरवण्यात आले आहेत, परंतु एव्हाना केवळ ९० लाख ५३ हजार ५२३ करोना लसीच्या डोसचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लसीच्या अपव्ययाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात पहिला डोस ८५.९५ टक्के आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आला तर दुसरा डोस केवळ ४१ टक्के लोकांना देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या