आर्यन खानला दिलासा नाही : २० ऑक्टोंबरपर्यंत कोठडीतच मुक्काम

आर्यन खानला दिलासा नाही : २० ऑक्टोंबरपर्यंत कोठडीतच मुक्काम
आर्यन खान

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा जामीनावर आज कोर्टाने निकाल राखून ठेवला. आता आर्यन खानच्या जामीनावर २० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यामुळे आर्यन खानचा मुक्काम २० ऑक्टोंबरपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच असणार आहे.

आर्यन खान
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी (NCB)कोठडीतच असणार आहे. कारण आता आर्यन खानच्या (Aryan Khan)जामीन अर्जावर २० ऑक्टोंबरवर सुनावणी करण्यात येणार आहे.

चौथ्यांदा वाढली कोठडी

ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती. त्यानंतर आठ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने 14 दिवसांची कोठडी आरोपींना सुनावली. तिसऱ्यांदा पुन्हा दोन दिवसांनी कोठडी वाढवण्यात आली. आता आज निकाल राखून ठेवल्यामुळे आर्यनची कोठडी चौथ्यांदा वाढली.

Related Stories

No stories found.