Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनआर्यन खानची सुटका लांबणीवर, असा झाला आज ड्रामा

आर्यन खानची सुटका लांबणीवर, असा झाला आज ड्रामा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (aryan khan)क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात काल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. परंतु आजची रात्रही आर्यन खानला आर्थर रोड कारागृहातच (Arthur Road Jail mumbai) काढावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. परंतु जामीनाची प्रत कारागृहातील पेटीत निर्धारित वेळमर्यादेत न पोहोचल्यामुळे आर्यनची सुटका लांबली. जामीन अर्जाची प्रत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळं त्याची आणखी एक रात्र कारागृहातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

जुही चावलाने भरला जामीन

अभिनेत्री जुही चावलाने आज आर्यन खानचा जामीन भरला आहे. जामीन भरण्यासाठी कुटुंबीयांपैकी कुणी चालत नाही. फॅमिली फ्रेंड्सने जामीन भरायचा असतो त्यामुळेच जुही चावलाने हा जामीन भरला आहे. जुही चावला सेशन्स कोर्टात पोहचली असून तिने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही रेड चिलीज एंटरटेन्मेंट या कंपनीत पार्टनर आहेत. मुलाला घेण्यासाठी खुद्द शाहरुख खान आर्थर रोड कारागृह परिसरात पोहोचल्याचं म्हटलं गेलं. पण, जामीनाची प्रत कारागृहातील पेटीत निर्धारित वेळमर्यादेत न पोहोचल्यामुळे आर्यनची सुटका लांबली.

काय आहेत अटी?

1- आरोपीने कोणत्याही अवैध गोष्टींमध्ये सहभागी होऊ नये.

2- आरोपीला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयासमोर जमा करावा लागेल

3- आरोपीने न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कारवाईच्या संदर्भात कोणतेही विधान करू नये.

4- आरोपीने वैयक्तिकरित्या किंवा पुराव्यावर प्रभाव टाकण्याचा किंवा छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये.

5- अर्जदारांना मुंबईबाहेर जायचे असल्यास त्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्यासंबंधी माहिती द्यावी लागेल.

6- अर्जदार दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात उपस्थित राहतील.

7- जोपर्यंत कोर्टाकडून सूट दिली जाणार नाही तोवर आरोपी सर्व तारखांना न्यायालयात हजर राहावं लागेल.

8- एकदा खटला सुरू झाल्यानंतर, आरोपीने खटल्याला कोणत्याही प्रकारे विलंब करण्याचा प्रयत्न करू नये.

9- आरोपीने यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास NCB ला त्याचा जामीन रद्द करण्यासाठी थेट विशेष न्यायाधीश/न्यायालयाकडे अर्ज करण्याचा अधिकार असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या