आर्यनची दिवाळी ‘मन्नत’वर, जामीन मंजूर
आर्यन खान

आर्यनची दिवाळी ‘मन्नत’वर, जामीन मंजूर

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्जावर आज निर्णय झाला. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह इतर दोघांना जामीन मंजूर केला आहे.

आर्यन खान
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

क्रुझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर (Bail Application) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष एनडीपीएस कोर्टात (NDPS Court) सुनावणी झाली होती. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेता यांचाही जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर आर्यनने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने आज तिघांना जामीन दिला.

आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यन खान
अशी झाली अनन्याची आर्यनशी ओळख

एनसीबीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

अनिल सिंग म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

उद्या तुरुंगातून बाहेर येणार

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं.

काय आहेत अटी?

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com