पंजाबमधील रॅली भोवली : केजरीवाल यांना कोरोनाची लागन


पंजाबमधील रॅली भोवली : केजरीवाल यांना कोरोनाची लागन
अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांना कोरोनाची लागन (tested positive)झाली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी संपर्कात येणाऱ्या लोकांना स्वतःला विलगीकरण आणि चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

अरविंद केजरीवाल
कोरोनाच्या सुपर स्प्रेडर विवाहातील नवरीही पॉझिटिव्ह, अनेक मोठ्या नेत्यांना लागण

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी केजरीवाल यांचे विनामास्क फोटो शेअर करत त्यांना ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंजाब आणि चंडीगढमधील केजरीवाल यांच्या रॅलीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच यासोबत त्यांनी 'Those who come in touch' असं कॅप्शनही देत आहेत. नेटकऱ्यांनी जे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत, ते एक दोन दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्या चंडीगढ येथील रॅलींचे आहेत. यामध्ये ते विनामास्क दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com