Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकेजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, चौथी...

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, चौथी…

नवी दिल्ली | New Delhi

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) सडकून टीका केली आहे. आम आदमी पक्षाने रविवारी मोठी रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला…

- Advertisement -

Nashik Road : दारणा नदीपात्रात दोघे बुडाले; शोधकार्य सुरु

यावेळी रॅलीला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, ‘१२ वर्षांपूर्वी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात रामलीला मैदानावर एकत्र आलो होतो. आज १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा याच मैदानावर आपण एका अहंकारी हुकूमशहाला हटवण्यासाठी एकत्र आलो आहोत,’ अशी टीका त्यांनी केली

Monsoon Update : आला रे आला…! अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल

तसेच पुढे केजरीवाल यांनी भाषण करताना पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘चौथी पास राजा’ असा करत केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, “१९ मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल फेटाळला. पंतप्रधान म्हणतात की सुप्रीम कोर्टाला मानत नाही. तसेच मोदीना वाटते की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकल्याने आमचे काम थांबेल. आमच्याकडे एक नाही तर १०० सिसोदिया आहेत, १०० सत्येंद्र आहेत. एक गेला तर दुसरा कामावर येईल. त्यांना तुरुंगात टाकून काम झाले नाही, म्हणून त्यांनी अध्यादेश आणला. दिल्लीतील जनतेवर अध्यादेश लादला जात आहे. दिल्लीचे सातही खासदार घरात लपून बसले आहेत’, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे पंतप्रधान मिळाले आहेत जे सुप्रीम कोर्टालाही जुमानत नाहीत. देशभरातील सर्वच लोक थक्क झाले आहेत. देशातील लोकांना विश्वास बसत नाही इतका अहंकार पंतप्रधानांमध्ये आहे,” अशी घणाघाती टीकाही अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

Nashik Accident News : दुचाकीच्या धडकेत सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

तसेच सगळीकडे बेरोजगारी पसरली आहे, ही कशी दूर करायची, ते समजत नाही. भ्रष्टाचार कसा दूर करायचा, हे समजत नाही. जीएसटीमुळे व्यापारी चिंतेत आहेत. रेल्वेचे काय झाले आहे. २००२ मध्ये पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री झाले. १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गेली 9 वर्षे ते पंतप्रधान आहेत. २०१६ मध्ये मी मुख्यमंत्री झालो, मला 8 वर्षे झाली. मी आज त्यांना आव्हान देतो, इतक्या वर्षात तुम्ही काय काम केले आणि मी काय काम केले…’ अध्यादेश काढून आपल्यालाच सरकार चालवायचं आहे असा मोदींचा हट्ट असल्याची टीकाही अरविंद केजरीवाल यांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या