जाणून घ्या, सोन्यासंदर्भातील ही महत्वाची माहिती

gold prices
gold prices

नवी दिल्ली
भारतीयांना जुन्याकाळापासून सोन्याचे मोठे आकर्षण आहे. सोन्यासंदर्भातील या अनेक गोष्टी तुम्हाल माहीत नसतील. भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीनं भारतात सोने विकले जाते.

१) जगात सर्वांत जास्त सोने दक्षिण आफ्रिकेनंतर भारतात आढळते. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे.
२) सोन्याची किंमत लंडनमधील बुलियन मार्केट'मध्ये ठरते. ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते. तेथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि दुपारी ३ वाजता ही किंमत ठरवली जाते.
३) भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत. कर्नाटकाच्या हुट्टी, उतीबरोबर झारखंडच्या हिराबुद्दिनी येथे सोन्याची खाण आहे. गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधले उत्खनन कमी झाले आहे. त्यामुळे भारताला आता सोने आयातीवर अवलंबून राहावे लागते.
४) भारतात सर्वांत जास्त सोने मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती धन आहे, याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही.
५) आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरामधल्या सोन्याचा साठा सर्वश्रूत आहे.
६) सरकारकडून सर्वांत जास्त सोने बँकांच्या लॉकर्समध्ये साठवले जाते. आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल ६०० अब्ज डॉलर्स किमतीचं सोने आहे.
७) भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात.
८) सध्या भारतात चलन आणि सोन्याचं कोणतंही नातं नाही. याअगोदर देशाकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यानुसार चलन छापले जात होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com