Ajit Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच नाशकात; पायी चालत केलं जोरदार शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच नाशकात; पायी चालत केलं जोरदार शक्तिप्रदर्शन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिकमध्ये शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे...

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतेच अजित पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर शासन आपल्या दारी उपक्रमाच्या निमित्ताने अजित पवार पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे नाशकात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. नाशकात एन्ट्री करताच अजित पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजित पवार आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले. अजित पवार यांनी नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनतर पायी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात पोहोचले आहेत.

यावेळी आमदार सरोज अहिरे, आमदार दिलीप बनकर, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, प्रशांत वाघ, चैतन्य देशमुख, रितेश केदारे, योगेश निसाळ, वसंत अरिंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com