Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहापालिका अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक

महापालिका अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या (Municipal Corporation) नवीन नाशिक विभागीय कार्यालयातील (Navin Nashik Divisional Office) बांधकाम विभागाच्या (Construction Department) तांत्रिक सहाय्यकास (Technical Assistant) ठेकेदाराकडून २४ हजार रुपयांची लाच (bribe) घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहात पकडले.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकण्याकरीता तक्रारदार ठेकेदाराकडून (Contractor) भाऊराव काळू बच्छाव याने २५ हजाराची लाच (bribe) मागीतली होती तडजोडीअंती २४ हजार रुपये देण्याचे कबूल झाले होते.

संशयित बच्छाव यास पंचासमक्ष सदरहू रक्कम घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहात पकडून अटक केली. हि कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,

अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक अभिषेक पाटील,सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक,संदीप साळुंखे, सापळा पथक असई सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील आदींच्या पथकाने यशस्वीरित्या राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या