शासकीय कार्यालयांकडे 'इतक्या' रुपयांची थकबाकी; वाचा सविस्तर

जप्तीसाठी मनपा आयुक्तांच्या निर्देशाची प्रतीक्षा
शासकीय कार्यालयांकडे 'इतक्या' रुपयांची थकबाकी;  वाचा सविस्तर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासकीय कार्यालयांचा तब्बल 9 कोटी 91 लाख इतका मालमत्ता कर थकला आहे. वारंवार स्मरणपत्र देऊनही ही शासकीय कार्यालये दाद देत नसल्याने आता खासगी मालमत्तांप्रमाणेच करसंकलन विभागाच्या माध्यमातून शासकीय मालमत्ता जप्तीचा विचार करण्यात येत असून याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्ताकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याने नागरिकांमध्ये याबाबत उत्सूकता दिसून येत आहे.

मनपा आयुक्तांनी सुटीवर जाण्यापूर्वी मनपाच्या कर संकलन विभागाला मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते. तसे न झाल्यास कारवाईलाचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिला होता.

प्रत्यक्षात मालमत्ता थकबाकीचा आकडा जवळपास पाचशे कोटींच्या घरात होता. करसंकलन विभागाने ढोल बजाओ, स्मरणपत्रे, नळ कनेक्शन तोडणे, वारंट बजावणे आदी कारवाईच्या माध्यमातून जवळपास दीडशे कोटींच्या आसपास थकबाकी वसूल केली आहे. पण सर्वात अडचणीचा भाग हा शासकीय कार्यालयांच्या थकबाकी वसुलीचा आहे. महापालिका हद्दितील एकूण 31 शासकीय कार्यालयांकडे वर्षांनुवर्ष मालमत्ता कर थकला असून करसंकलन विभागाने त्यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

शासकीय कार्यालयांवर थेट कारवाई करता येत नसली तरी त्यांनी थकबाकी अदा करावी यासाठी त्यांना आयुक्तांच्या परवानगीनंतर जप्तीची कारवाई का करु नये, अशी नोटीस बजावली जाणार आहे. या उपरही सहकार्य न मिळाल्यास महापालिका कायद्याचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्यावर जप्तीची कारवाई करु शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांना लावण्यात येणारा करवसुलीचा नियम शासकीय कार्यालयांना देखील लावण्यात यावा, अशी मागणी नागरिक करताना दिसून येत आहेत.

शासकीय कार्यालाकडील थकबाकी

पोलीस आयुक्त (21,19,426), एक्ससाइज (5,34,831), आयकर(1,89,51,709), पोलीस अधीक्षक (27,640), सीडीओ मेरी (47,678), विद्युत भवन(1,92,902), कमिशनर पोलीस सिटी (3,75,618), पोस्ट ऑफिस (29,30,290), जिल्हा परिषद - (1,72,893), सह अभियंता सिव्हिल (22,04,998), जिल्हाधिकारी (11,17,829), बीएसएनल (1,71,36,741), जिल्हा रुग्णालय ( 1,31,696), तहसीलदार (1,54,128), धान्य वितरण कार्यालय. ना.रोड (82,16,474), महसूल आयुक्त (2,52,86,228), सेंट्रल डिफेन्स - (1,73,878), शा.तंत्रनिकेतन (40,57,924),रेल्वे स्टेशन - (9,72,545), नगररचना. ना.रोड (19,24,817), बांधकाम विभाग - (34,666)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com