
नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुंछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या वाहनाला भीषण आग (fire) लागल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर वाहनाने काही जवान (solder) प्रवास करत होते. त्यावेळी वाहनाला अचानक आग लागल्याने या दुर्घटनेत ४ जवान जखमी झाल्याचे बोलले जात आहे. तसेच आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लष्कराचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.