Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशचीनशी तणावाच्या पार्श्वभूमीवर सेनाप्रमुख लडाखमध्ये

चीनशी तणावाच्या पार्श्वभूमीवर सेनाप्रमुख लडाखमध्ये

नवी दिल्ली

चीनशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे सकाळी लडाखमध्ये पोहचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्ट रोजी समोरा समोर एकमेकांना भिडले. Tso Lake भागात चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला. लडाखमधील घुसखोरीवरुन एप्रिलपासून दोन्ही देशांत तणाव सुरु आहे. चर्चेचा अनेक फेऱ्या झाल्यानंतर अजून तोडगा निघाला नाही. त्यानंतर पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला.

दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल सध्या दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे आणि लष्कराच्या विशेष मोहिमांचे संचालक उपस्थित आहेत. या बैठकीत तणाव निवळण्यासाठी मार्ग काढण्यावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर सीमेवर नव्यानं निर्माण झालेल्या वादावर तोडगासंदर्भात चर्चा केली जात आहे. तसेच गुरुवारी सकाळीच लष्करप्रमुख मनोज नरवणे सकाळी लडाखमध्ये पोहचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मागच्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांध्ये चर्चा सुरु आहेत. पण या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नाही. चिनी सैन्याने फिंगर आठ पर्यंत माघारी फिरावे,अशी भारताची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या