विरोध डावलून रस्तासफाई यंत्र खरेदी प्रस्ताव मंजूर

विरोध डावलून रस्तासफाई यंत्र खरेदी प्रस्ताव मंजूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिवसेना (Shiv Sena), कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) विरोधाला डावलून सत्ताधार्‍यांनी महासभेत गोंधळात रस्ता सफाई यंत्र (Cleaning machine) खरेदी तसेच पाच वर्षासाठी त्याचे ऑपरेशन आणि कॉम्प्रेहेन्सीव मेंटेनन्ससाठीच्या (Operation and Comprehensive Maintenance) 33 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

महासभेत सुरूवातीला काही विषय झाल्यावर महापौर कुलकर्णी (Mayor Kulkarni) यांनी स्थायी समिती सभापती गणेश गिते (Standing Committee Chairman Ganesh Gite) यांना त्यांच्या जागी बसवून निघून गेले, तर शेवट पर्यंत गिते यांनीच महासभा (General Assembly) चालवली. दरम्यान, सदस्यांच्या विकास कामांना गिते यांनी मंजुरी दिली, मात्र जादा विषयातील शेवटच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.

केंद्र शासनाची योजना (Central Government's plan) 15 व्या वित्त आयोगातील निधीतून नाशिक (Nashik) शहरातील सार्वजनीक ठिकाणचे रस्ते साफसफाई व स्वच्छता (Cleaning and sanitation of roads in public places) करण्यासाठी मॅकेनिकल रोड स्विपर (Mechanical road sweeper) खरेदी करणे व पाच वर्ष कालावधीकरीता ऑपरेशन आणि कॉम्प्रेहेन्सीवह मेंटेनन्स करणे या कामाचे प्राकलन 33 कोटी 44 लाख 52 हजार रुपये हा विषय प्रशासकिय मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात आला होता.

करोनामुळे (Corona) अगोदरच मोठ्याप्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली असून मनपाचे सफाई सेवक पिढ्यान्पिढ्यांपासून मनपाच्या माध्यमातून सेवा देत आहेत. अशा वेळी कोट्यवधी रुपये खर्च करुन मशिनद्वारे रस्ते सफाईची गरज नाही, यापेक्षा स्थानिक बेरोजगारांना मानधनावर कामावर घेण्यात यावे, असे सांगत मनसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख यांनी विरोध केला.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते गजानन शेलार (Nationalist Congress Party group leader Gajanan Shelar) यांनीही प्रत्येक नगरसेवकाकडून 5 जणांना कामाची संधी द्यावी. या कंपनीच्या मेंटेनन्ंस खर्चामुळे बेरोजगारी वाढणार आहे. अनेक पदवीधर नाईलाजास्तव सफाईचे काम करीत आहेत. दुसरीकडे सफाई सेवक आंदोलन करीत असून मशिनद्वारे सफाईच्या ठेक्याला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे सांगितले.

विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते (Leader of the Opposition Ajay Boraste) यांनी हा विषय अनेक वेळा महासभेत येतो व फेटाळण्यात येतो, तरी हा बालहट्ट कोणाचा आहे, असा प्रश्न उपस्थित करुन प्रस्तावाला विरोध केला. शहरातील रस्त्यांची हालत पाहिली तर हे आधुनिक यंत्राद्वारे झाडू यशस्वी होणार नाही, असा टोला लगावला. तसेच या कामांसाठी भुमीपुत्रांचा विचार करण्याची सुचना केली.

सफाई सेवक अनेक पिढ्यांपासून सेवा देत त्यांच्यावर अन्याय नको, इतर गोष्टींसाठी असे प्रयोग का होत नाही, असे सांगत विरोध केला. काँग्रेस गट नेते शाहू खैरे यांनी या विषयाला विरोध केला. यामुळे काही काळ विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये बाचाबाची होऊन गोंधळ निर्माण झाला होता. सभागृह नेते कमलेश बोडके यांनी या विषयाचे समर्थन केले. हा शेवटचा विषय होता, म्हणून गणेश गिते यांनी सर्व विषयांना मंजुरी देत हा विषयही मंजूर करीत राष्ट्रगीत सुरू करण्याची सुचना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com