आदिवासी क्षेत्रातील रस्ते, पुलांसाठी निधी मंजूर

आदिवासी क्षेत्रातील रस्ते, पुलांसाठी निधी मंजूर
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासी भागातील Tribal Area 493 रस्ते व पुलांच्या कामांसाठी 90 कोटी आदिवासी भागातील 493 रस्ते व पुलांच्या कामांसाठी Roads & Bridges 90 कोटीच्या निधीस आदिवासी विकास विभागाने Department of Tribal Development आदिवासी घट कार्यक्रमांतर्गत मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदे अंतर्गतच्या रस्ते दुरुस्ती आणि सुधारणांच्या कामांसाठी 2019-20 आणि 2020-21 मधील प्रलंबित देयापोटी 92 रस्त्यांच्या कामांसाठी 15 कोटी दोन लाख मंजूर केले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील एकूण 44 रस्त्यांच्या कामांसाठी 13 कोटी 94 लाखांच्या निधीचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे (कंसात कामांची संख्या) नाशिक- 11 कोटी 2 लाख (23), धुळे-4 कोटी 56 लाख (8), नंदुरबार 35 कोटी 53 लाख (63), पालघर-31 कोटी 90 लाख (379), नांदेड-76 लाख (3), हिंगोली-1कोटी 18 लाख (2), यवतमाळ- 1 कोटी 10 लाख (2), चंद्रपूर 46 लाख (1), गडचिरोली-2 कोटी 96 लाख (11), नगर 50 लाख (1).

नाशिक जिल्ह्यातील 21 रस्ते

जिल्हा परिषद अतर्गत आदिवासी क्षेत्रातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या निधी खर्च करण्यासाठी मान्यता मिळालेल्या रस्त्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील 21 कामासाठी 2 कोटी 92 लाखांचा समावेश आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांसाठी निधी आणि रस्त्यांच्या कामांच संख्या पुढीलप्रमाणे- 2 गोंदिया-7 कोट 14 लाख 40, ठाणे-9 लाख 6 पालघर-4 कोटी 86 लाख 30 या निधीसाठी नियंत्रण अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी असतील

निधी मिळालेले नाशिक जिल्ह्यातील रस्ते

साल्हेर वाघंबा, हरणबारी-मोहळांगी, घोटी ते तळाशी, घोंडबार ते पाचपट्टा, ओझरखेड ते नागलगाव, हरसुले ते घोंडवार ते आगासखिंड, वाडगाव नाईकवाडी, पासलघर वस्ती ते नांदगाव, साल्हेर-सावरपाडा, बोरदैवत, छोटे ते मोठे महारदार,तिळवण ते दहिंदुले, गघडपाडा ते मंगलीदार, शिरसमाणी ते सटवाई फाटा, ककाणे ते ककाणेपाडा, भेडी ते देवरे वस्ती, जाड ते गव्हाणपाडा, भिंगखेत जोडरस्ता, गोळवाड ते शेरवड भवानी, जाडचे भाटेपाडा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com