राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता

वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना
राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी For wildlife safety आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्यास State Wildlife Action Plan मुख्यमंत्री Chief Minister उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या State Wildlife Board बैठकीत मान्यता देण्यात आली.

सन २०२१ ते २०३० या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश ठाकरे यांनी यावेळी दिले.

राज्याच्या वन विभागात जलद कृती दलाची स्थापना करणे आणि त्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचारार्थ पाठवण्याच्या सूचना ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'ठिपकेदार मुंबईकर: आरेमधील बिबटे' ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.वन विभागाने मागील दोन वर्षात वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कामाची माहिती देणारी ध्वनी चित्रफीत ही दाखवण्यात आली.

राज्य वन्यजीव कृती आराखडा

राज्य वन्यजीव कृती आराखडा १२ प्रकरणात विभागला असून यात दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन, शिकार आणि वन्यजीवांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण, मानव वन्यजीव संघर्षावर उपाययोजना आणि बचाव कार्य, वन्यजीवांचे आरोग्य व्यवस्थापन, प्रादेशिक भू प्रदेशातील जल परिसंस्थेची संवर्धन प्रणाली, किनारी आणि सागरी परिसंस्थांचे संवर्धन, वन्यजीव क्षेत्रातील पर्यटन व्यवस्थापन,

संवर्धनाची जाणीव जागरूकता, लोकसहभाग, संशोधन आणि सनियंत्रण बळकट करणे, वन्यजीव क्षेत्रासाठी शाश्वत निधी सुनिश्चित करणे, राज्यात संरक्षित क्षेत्राचे जाळे बळकट करणे आणि वाढवणे या विषयांचा समावेश आहे. संबांधित शासकीय विभाग, त्या क्षेत्रातील शास्रोक्त संस्था, अशासकीय संस्था यांची एक समिती स्थापन करून या आराखड्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्यात येईल.

दरम्यान,आराखड्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहण्यासाठी सनियंत्रण समितीची स्थापना करावी, अशी सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला आमदार धीरज देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.