Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याभगूरला ग्रामीण रुग्णालय उभारणीस मान्यता; शासन आदेश जारी

भगूरला ग्रामीण रुग्णालय उभारणीस मान्यता; शासन आदेश जारी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District) भगूर ( Bhagur ) येथे नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापन ( Rural Hospital )करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health )गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींंनी भगूर येथे ग्रामीण रुगणालय उभारण्याची वारंवार मागणी केली होती. राज्य सरकारने या मागणीची दाखल घेत त्याला मंजुरी दिली आहे.

ग्रामीण रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा उपलब्ध करून बांधकाम करण्यासाठी अंदाज आराखडा तयार करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात यावा. रुग्णालयाच्या पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या