अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरणास मंजुरी

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरणास मंजुरी
USER

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी पूरग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.या अनुषंगाने महसूल आणि वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी केला होता.

पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेली नुकसान भरपाई म्हणून मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

विभागवार मदत

कोकण : ८ कोटी ५१ लाख

पुणे :१५० कोटी १२ लाख

अमरावती : ११८ कोटी ४१ लाख

औरंगाबाद : ७७ कोटी ९७ लाख

नागपूर :१० कोटी ६५ लाख

Related Stories

No stories found.