Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपात अनुकंपा तत्वावर वारसांना नियुक्ती

नाशिक मनपात अनुकंपा तत्वावर वारसांना नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका सेवेत गट क व ड मधील संवर्गातील दिवंगत कर्मचार्‍यांच्या 197 वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा महत्वपुर्ण निर्णय नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील आदेश नगरविकास काढले आहे. दरम्यान नगरविकास विभागाच्या आदेशानुसार अनुकंप तत्वावरील वारसांना तातडीने मनपा सेवेत घ्याव्यात अशा मागणीचे निवदेन शिवसेना पदाधिकार्‍यांनी आयुक्त कैलास जाधव यांना दिले.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिका सेवेतील गट – क व गट – ड संवर्गातील दिवंगत झालेल्या कर्मचार्‍याच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत तातडीने सामावून घेण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. याच निर्णयानुसार नगरविकास विभागाकडुन गेल्या 19 जानेवारी 2021 रोजी मनपा आयुक्तांना आदेश पत्र पाठविण्यात आले आहे. या आदेशात सन 2005 ते 2013 या कालावधीत नाशिक महापालिकेतील अनुकंपा तत्वावर देण्यात आलेल्या 132 अतिरीक्त नियुक्त्यांची बाब क्षमापित करण्यात येत आहे.

सन 2015 ते आजतागायत प्रचलित धोरणानुसार (शासन निर्णय दि. 11 – 07 – 2019 नुसार) अनुकंप तत्वावर भरावयाची पदे निश्चित करुन सरळ सेवेच्या रिक्त असलेल्या पदांवर प्रतिक्षा यादीतील वारसांना नियमानुसार नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे म्हटले आहे. या आदेशानुसार गेल्या अनेक वर्षापासुन अनुकंपा तत्वावर मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना मनपा सेवेत समावून घेण्याचा सुटला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नुकतीच नाशिक शिवसेना पदाधिकारी व मनपा नगरसेवक यांची बैठक होवून बैठकीत यात महानगरपालिकेच्या अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा झाली होती. यात अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पदाधिकारी व नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिवंगत झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना तात्काळ सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले.

या नगरविकास विभागाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच शासनाकडे नियमित वेतन श्रेणीवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाते. त्याप्रमाणेच नाशिक महानगरपालिकेने शासनाकडे पाठवलेल्या किमान वेतन ( मुळ वेतन + ग्रेड वेतन + महागाई भत्ता) च्या धर्तीवर प्रथम नियुक्ती दिनांकापासुन अनुकंपा तत्वावर वारसांना वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विनायक पांडे, सेना गटनेता विलास शिंदे, सुनिल बागुल, वसंत गितेदत्ता गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या