Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांंची नियुक्ती

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांंची नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर ( Administrator on Nashik APMC ) प्रशासक अथवा प्रशासकीय मंडळ नेमण्याचे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा उपनिंबधक सतीश खरे यांनी बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक म्हणून नाशिक तालुका उपनिंबधक फयाज मुलाणी (Nashik Taluka Deputy Registrar Fayaz Mulani )यांची नियुक्ती केली असून याबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.प्रशासकाची नियुक्ती झाल्याने संचालक मंडळाचा कारभार संपुष्टात आला आहे.

- Advertisement -

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा, यासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.याचिकाकर्ते शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मनमानी कारभार चालविला असल्याने व त्यांची मुदतही संपुष्टात आल्याने तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी त्यांनी केली होती.

यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने सहकार विभाग व बाजार समितीला नोटीसा बजावत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. बाजार समितीने न्यायालयात आपले म्हणणे सादर करतांना, संचालक मंडळाने नोव्हेंबर महिन्यात केलेल्या बाजार समितीची निवडणूक घेण्याच्या ठरावाच्या अनुषंगाने संचालक मंडळ बरखास्त करण्याऐवजी बाजार समितीची निवडणूक घेण्यात यावी,अशी बाजू मांडली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याच्या आदेश दिले होते. यास पुन्हा आवाहन देण्यात आले होते.

याचिकाकर्ते शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मनमानी कारभार चालविला असल्याने व त्यांची मुदतही संपुष्टात आल्याने तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतले होते. त्यावर 4 मार्च रोजी अंतिम सुनावणी होऊन यात येत्या तीन आठवडयात सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासकाची अथवा प्रशासकीय मंडळाची नेमणूक करावी, असे आदेश दिले.

न्यायालयाचे आदेश जिल्हा उपनिंबंधक कार्यालयास प्राप्त झाले.या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक म्हणून नाशिक तालुका उपनिंबंधक मुलानी यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकाची नियुक्ती झाल्याने संचालक मंडळाचा कारभार संपुष्टात आलाआहे.

मालेगाव येथील जनता बँकेच्या निवडणूक प्रक्रियेचे सद्यस्थितीत कामकाज तीन दिवस बघावे लागणार आहे. सोमवारी (दि.28) पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी वर्गाशी चर्चा करून काही बेसिक गरजांवर लक्ष केंद्रित केले जाईल.आपण शेतकर्‍याचा मुलगा असून, कृषी विषयातच पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.

– फय्याज मुलाणी, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

( Fayaz Mulani, Administrator, Agricultural Produce Market Committee, Nashik )

- Advertisment -

ताज्या बातम्या