जिल्ह्यातील 'या' बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती

लासलगाव, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी , देवळा समित्यांचा समावेश
जिल्ह्यातील 'या' बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह(Lasalgaon APMC ) जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, दिंडोरी आणि देवळा बाजार समित्यांवर शासकीय प्रशासकाची नियुक्ती झाली. चांदवड येथील सहाय्यक निबंधक सविता शेळके यांनी लासलगाव बाजार समितीच्या शासकीय प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची 10 मे 2021 ला मुदत संपुष्टात आली होती. मात्र शासनाकडून कोरोना व न्यायालयामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी याचिका दाखला झाल्याने तीन वेळा विद्यमान संचालक मंडळाला वाढीव मुदत दिली होती . 29 जानेवारी रोजी निवडणूक घेण्याचे आदेश असल्याने मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने 30 एप्रिल पूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यामुळे सहाय्यक निबंध सविता शेळके यांंची लासलगाव बाजार समितीच्या शासकीय प्रशासकपदी नियुक्ती झाली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची वाढीव मुदत संपुष्टात आल्याने जिल्हा उपनिबंधक आणि माझी शासकीय प्रशासकपदी नियुक्ती केली आहे शेतकरी, व्यापारी, बाजार समितीचे इतर घटक मला सहकार्य करतील असे आवाहन करते

- सविता शेळके, शासकीय प्रशासक ( Savita Shelke, Government Administrator )

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com