दहावी परीक्षेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती

दहावी परीक्षेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education सन 2022 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचे अर्ज SSC Examination Applications येत्या 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड School Education Minister Prof. Varsha Gaikwad यांनी बुधवारी केले.

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार आणि तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज डठङ डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार आणि तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज प्रचलित पद्धतीप्रमाणे 10 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत.

विलंब शुल्कासह हे अर्ज 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2021या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 18 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2021 असा आहे.

माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट 4 जानेवारी 2022 रोजी जमा करावयाची आहे. अर्ज नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com