संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांसाठी उद्योजकांनो सज्ज व्हा

- विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांसाठी उद्योजकांनो सज्ज व्हा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या ( Corona ) संभाव्य तिसर्‍या लाटेच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे( Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game ) यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक पार पडली.

नाशिक विभागातील विभागीय आयुक्तांनी उद्योगांमधील तिसर्‍या कोव्हिड लाटेला तोंड देण्याच्या तयारीबाबत बैठकीत आढावा घेतला. यावेळी उद्योजकांंनी मिशन मोडवर येऊन आपल्या सेवकांंचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्याचे आवाहन विभागीय आयुक्त गमे यांनी केले.

या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( Collector Suraj Mandhare ), नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा( president of NICE- Vikram Sarda ), सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालीक, आयमा अध्यक्ष वरुण तलवार, धनंजय बेळे, शशी जाधव, सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी व उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनीही सध्याच्या काळात कोविड रिलीफ फंडासाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी’ (सीएसआर) फंडाचा वापर करण्याकडे उद्योगांनी लक्ष देण्याचे आवाहनही केले.

आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांच्यासह इतरांनी राज्य सरकारच्या निर्देशांनुसार काही विषयांवर चिंता व्यक्त केली. तिसर्‍या कोव्हिड लाटेत रहदारीचे निर्बंध लागू असतील तेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात कामगार आवास उभारणीचे बंधन अडचणीचे असल्याचे सांगितले. त्याऐवजी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले आणि वाहतुकीचीही सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी बैठकीचा सविस्तर अहवाल तयार करुन राज्य सरकारसमोर सादर केला जाईल आणि त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार उद्योगांच्या कामकाजासाठी मोडस ऑपरेंडीबाबत निर्णय निश्चित केला जाईल, असे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com