Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याAPMC Election 2023 : पिंगळेंनी गड राखला कायम

APMC Election 2023 : पिंगळेंनी गड राखला कायम

नाशिक कृउबा समितीच्या १५ जागांसाठी काल ९६.३४ टक्के मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात मतमोजणी होऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Nashik APMC Election) निकाल जाहीर झाला   आहे. यात पिंगळे गटाला ९ तर चुंभळे गटाला ६ जागा मिळाल्या असून पिंगळे गटाने पुन्हा एकदा बाजार समितीवर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून देत विजयी गुलाल उधळला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी सर्व साधारण गटातून शेतकरी पॅनलचे प्रभाकर माळोदे यांना ५६० मते मिळाली असून तर आपलं पॅनलचे उमेदवार उत्तम खांडबहाले यांना ५७० मते मिळाली आहेत. या दोघांमध्ये १० मतांचा फरक असल्याने खांडबहाले यांनी फेर मतमोजणीचा अर्ज दाखल केला आहे. आता मतमोजणी सुरु आहे.
नाशिक बाजार समितीसाठी शिवाजी चुंभळे, देविदास पिंगळे, संपतराव सकाळे, तानाजी करंजकर, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, राजाराम धनवटे हे उमेदवार आघाडीवर आहेत.
पराभूत उमेदवाराच्या समर्थकाच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्यामुळे पिंपळगावला सायंकाळी चारच्या सुमारास तणाव निर्माण झाला. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत २०० ते ३०० नागरीकांचा जमाव पोलीस स्टेशनवर चालून आला. संशयितांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी लावून धरली आहे. पिंपळगाव बसवंत पोलीस जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी महिला गटातून शेतकरी पॅनलच्या कल्पना चुंभळे ७१२ तर आपलं पॅनलच्या उमेदवार सविता तुंगार ६११ मतांनी विजयी झाल्या आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोरे गटाला १८ पैकी ९ तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलला ८ तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या १८ जागांमध्ये १० जुने पुन्हा विजयी झाले असून बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप व त्यांचे पती हे दोघेही निवडून आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी इतर मागासवर्गीय गटातून शेतकरी पॅनलचे धनाजी पाटील विजयी झाले असून त्यांनी  आपलं पॅनलचे उमेदवार दिलीप थेटे यांचा पराभव केला आहे. तर थेटे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला असून मतमोजणी सुरु आहे.    . नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून शेतकरी पॅनलचे प्रल्हाद काकड विजयी झाले असून त्यांनी आपलं पॅनलचे उमेदवार विश्वास नागरे यांचा पराभव केला आहे. 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर यांना ९९५, जगन्नाथ कटाळे ९५६, तानाजी गायकर ८९५ तर प्रकाश भोये ६७८ मते मिळाली असून यात माळेकर यांनी ९७ तर कटाळे यांनी ९७ मतांनी विजय मिळविला आहे. मात्र, तानाजी गायकर यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र टेबल लावत फेर मतमोजणी केली असता विजयाचा निकाल कायम राहिला आहे. तर जगन्नाथ कटाळे यांची फेरमतमोजणीत दोन मते वाढली आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर यांना ९९५, जगन्नाथ कटाळे ९५६, तानाजी गायकर ८९५ तर प्रकाश भोये ६७८ मते मिळाली असून यात माळेकर यांनी ९७ तर कटाळे यांनी ६१ मतांनी विजय मिळविला आहे. मात्र, तानाजी गायकर यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र टेबल लावला आहे. त्यावर सध्या मतमोजणी सुरु आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण १५ जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर आमदार दराडे गटाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.मालेगाव बाजार समिती :

सोसायटी गटाच्या ११ जागांची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून यात ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला मिळत आहेत.

- Advertisement -

सोसायटी गटातच हिरे यांनी निर्विवाद आघाडी घेतली आहे. युती असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांना धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत.

२० वर्षांपासून बाजार समितीवर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सोसायटी गटाचा कल लक्षात घेता अद्वय हिरे पालकमंत्री दादा भूसेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर ९५ तर जगन्नाथ कटाळे ९६ मतांनी विजयी झाले आहेत.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत फेर मत मोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेले. त्यानंतर अनिल कदम आणि यतीन कदमांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.नाशिक बाजार समिती ग्रामपंचायत सर्वसाधारण गटामधून विनायक माळेकर आणि जगन्नाथ कटाळे आघाडीवर आहेत.पिंपळगाव बसवंत बाजार समिती आर्थिक दुर्बल गटात राजेश पाटील 318, शरद काळे 286, आणि 32 मतांनी राजेश पाटील विजयी.पिंपळगाव बसवंत विजयी उमेदवार दिलीप बनकर – 533 अनिल कदम – 477 गोकुल गिते – 462 निवृत्ती शिरसाठ – 449 दिपक बोरस्ते – 448 रामभाऊ माळोदे – 441 डॉ. प्रल्हाद डेर्ले 424 खालकर मनीषा – 455 अमृता पवार – 519 यतीन कदम – 288 नंदु गांगुर्डे – 31.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे ६३१ मते मिळवून विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गटातील आर्थिक दुर्बल गटातून अपक्ष उमेदवार प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर विजयी झाले आहेत. सहकारी संस्था भटक्या जमाती प्रवर्गात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे विक्रम मार्कंड हे ५१५ मते मिळवून विजयी झाले आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटात लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या वैशाली जाधव व मिना शिरसाठ विजयी झाल्या असून ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकरी विकास पॅनल चे वाल्मिक वानखेडे विजयी झाले आहेत.ताज्या अपडेट्ससाठी ही लिंक रिफ्रेश करा…नाशिक बाजार समितीसाठी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निर्मला कड या ९९९ मतांनी विजयी झाल्या आहेत. सदानंद नवले यांचा पराभव झाला असून त्यांना एकूण ८१९ मते मिळाली आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीसाठी ग्रामपंचायत गटातून अनुसूचित जातीमधून दिलीप बनकर गटाचे नंदू गांगुर्डे विजयी झाले आहेचांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यात हमाल मापारी गटातून शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार हे ७५ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर व्यापारी गटातून लोकमान्य परीवर्तन पॅनलचे सचिन अग्रवाल हे १७० व शेतकरी विकास पॅनलचे सुशील पलोड १५८ मतांनी विजयी झाले आहेत.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ग्रामपंचायत गटात सर्वसाधारणमधून अपक्ष उमेदवार यतिन कदम विजयी झाले असून तर दिलीप बनकर गटातील शिरीष गडाख विजयी झाले आहेत. हमाल गटातून दिलीप बनकर गटाचे नारायण मामा पोटे विजयी, व्यापारी गटातून सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर विजयी. तीनही उमेदवार दिलीप बनकर गटाचे आहेत. नाशिक बाजार समितीसाठी पिंगळे गटाच्या आपलं पॅनलचे उमेदवार भास्कर गावित हे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून विजयी झाले आहेत. येवला हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचे समजते. त्यानंतर घोटी, सिन्नर, कळवण, दिंडोरी,या बाजार समित्यांचा निवडणूक निकाल लगेच जाहीर करण्यात आला होतयानंतर आज उर्वरित बाजार समित्यांचा निकाल जाहीर होत असून सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे.काल जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव आणि मनमाड अशा १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या