शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा सोसायटी मतदार संघात ९११ मतदान पैकी ८८९ मतदान झाले आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात ८६९ मतदारांपैकी ८४४ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. व्यापारी मतदारसंघ : १८६ पैकी १८३ मतदान.हमाल मापाडी मतदारसंघ : २२१ पैकी २२१ मतदान. हमाल मापाडी मतदारसंघातून शंभर टक्के मतदान झाले आहे. एकूण २१८७ पैकी २१३७ मतदान झाले आहे. एकूण टक्केवारी : ९७.७१.राहाता | तालुका प्रतिनिधीराहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 3 पर्यंत सरासरी 97.50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. सोसायटीच्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रावर मोठी रांग होती. ग्रामपंचायतीलला चारच मते द्यायची असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या 7 तासात सोसायटी मतदार संघात 3 वाजेपर्यंत 906 पैकी 881 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97.24 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 97.73 टक्के मतदानाचा हक्क बजावला, असे सरासरी या मतदार संघात 97.50 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रणेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत. मतमोजणी 5 वाजेनंतर चितळी रोडलगत असलेल्या घोलप मंगल कार्यालयात होणार आहे..अकोले | प्रतिनिधीअकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी येथील कन्या विद्या मंदिर येथे सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत सुमारे 93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे....माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळ व महाविकास आघाडी तसेच अन्य पक्षांचे शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत होत आहे. शेतकरी विकास मंडळाने तीन जागां बिनविरोध करत आपले खाते खोलले आहे.त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आजी- माजी आमदारांसह दोन्हीही मंडळाच्या प्रमुख धुरीणांनी तालुका पिंजून काढला. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांत प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.यानिमित्ताने दोन्हीही बाजूने व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यात आली. आजी -माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.आज सकाळी मतदान सुरू झाल्यापासून आजी माजी आमदार व त्यांचे समर्थक,प्रमुख नेते, कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून आहेत.दोन्हीही मंडळाचे उमेदवार समोरासमोर उभे राहून मतदार राजाला मतदानासाठी साकडे घालत आहे.दोन्हीही मंडळात जोरदार चुरस या निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे.दोन्हीही मंडळांकडून मतदारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे या परिसरात सुमारे एक किलो मीटर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या दिसत आहेत. दोन्हीही मंडळांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे. शहरातील कन्या विद्या मंदिर परिसरात मतदार व कार्यकर्ते यांची भाऊगर्दी दिसत आहे. यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी या मतदान केंद्र व बाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे.व्यापारी मतदार संघ :- एकूण मतदान 205 त्यापैकी 170 मतदान झाले.ग्रामपंचायत मतदार संघ:- एकूण मतदान 1185 पैकी 1033 मतदान पार पडले.सोसायटी मतदार संघात :- एकूण मतदान 1027 असून त्यापैकी 959 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी पावणे तीन वाजे पर्यंत एकूण टक्केवारी 93 टक्के मतदान झाले आहे..राहाता बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया वेगाने सुरु आहे. दुपारी 12 पर्यंत या 4 तासात सरासरी 74 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी चे संचालक मतदार या निवडणुकीसाठी मतदार आहेत. सकाळी 8 वाजेपासून राहाता शहरातील चितळी रोडलगत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. सोसायटी च्या मतदारांना 11 फुल्या माराव्या लागत असल्याने सोसायटी मतदान केंद्रावर मोठी रांग होती. ग्रामपंचायतला चार मतदान असल्याने गर्दी काहीशी कमी होती. पहिल्या तीन तासात सोसायटी मतदारसंघात 12 वाजेपर्यंत 906 पैकी 680 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 75.01टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदार संघात 619 पैकी 452 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 73.02 टक्के मतदानाचा हक्क बजावला. असे सरासरी या मतदार संघात 74 टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर काम पाहात आहेत. पोलीस यंत्रनेसह 85 कर्मचारी मतदान प्रक्रियेत आहेत..जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव या बाजारसमित्यांसाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. आज एकूण पाच बाजारसमित्यांची मतमोजणी सुरु होणार आहे. यात सिन्नर, दिंडोरी, कळवण, देवळा व घोटीतून कोणाच्या अंगावर गुलाल पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जस जसे निकाल हाती येतील तस तसे कोणाच्या पॅनलला एक हाती सत्ता मिळते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सिन्नरला आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे कोण बाजी मारणार? दिंडोरीत दत्तात्रय पाटील आपली सत्ता राखणार का? घोटीत संदीप गुळवे व गोरख बोडके हे तीन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत आपली सत्ता कायम ठेवणार का? बिनविरोधसाठी आटोकाट प्रयत्न झालेल्या देवळा बाजार समितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे वर्चस्व अबाधित राहणार का? कळवण बाजार समितीत आमदार नितीन पवार यांच्या समोर मविप्र संचालक रवींद्र देवरे यांनी आव्हान उभे केल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे या पाच ही बाजार समित्यांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांबरोबरच घोटी, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, मनमाड व सुरगाणा अशा 14 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ग्रामपंचायत मतदार संघात ८% तर सहकारी संस्था मतदार संघात २१% मतदान झाले आहे....सुरगाणा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 13 पैकी 12 बाजार समित्यांसाठी आज मतदान होत असून रविवारी (दि. 30) मनमाड बाजार समितीसाठी मतदान होणार आहे. 13 बाजार समित्यांच्या 223 जागांसाठी 537 उमेदवार रिंगणात आहे. 29 जागांवरील निवडणूक (Election) ही बिनविरोध पार पडली आहे. दरम्यान, बाजार समित्यांच्या निवडणुकीकडे आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे ही निवडणूक अंतिम टप्प्यात अस्तित्व आणि प्रतिष्ठेची झाल्याने मतदारांची पळवापळवी,विविध आमिषे दाखवत साम- दाम- दंड याचा पुरेपूरवापर झाल्याचे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात प्रचाराचा ज्वर चढत जाऊन आरोप-प्रत्यारोपांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.