नाशिककरांची चिंता वाढली
मुख्य बातम्या

नाशिककरांची चिंता वाढली

बारा दिवसात ६४ करोना बाधीतांचा मृत्यू

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरात जुलै महिन्याच्या १२ दिवसात शहरातील रुग्णालयात उपचार सुरु असतांना करोना बाधीत असलेल्या ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे शहरातील करोना बाधीतांचा मृत्यू दर वाढत चालला आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या अभ्यासावरुन मृतांतील ७५ टक्क्याच्या वरील व्यक्तींना इतर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी आता वृध्दांबरोबर ३० ते ५० वर्ष वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होऊ लागल्याने दिवसाला सरासरी पाच जणांचा मृत्यू होत असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाने करोना संदर्भात काळजी घेतांना दिलेल्या नियमांसोबत विशेषत: ६० वर्षावरील वृध्द पुरुष - महिला व १४ वर्षाच्या आतील मुले व बालकांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. या दोन्ही वयोगटात प्रतिकार शक्ती कमी असल्यानेमृत्यू संभवत असल्याने त्यांना गर्दीच्या िंठकाणी व बाजारपेठेत नेऊ नये अशाप्रकारे जनजागृती करण्यात आलेली आहे असे असतांना काही दिवसात बाधीतांच्या संपर्कात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृध्दांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

बाधीतांच्या संपर्कात आलेल्या तरुण वर्गात प्रतिकार शक्ती असल्याने त्यांच्यावर काही दिवस करोनाची लक्षणे दिसत नाही. मात्र याच तरुण वर्गाकडुन कुटुंबातील वृध्दांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. वृध्दांना रक्तदाब, दमा, मधुमेह असे आजार असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मास्क न लावल्याने, सामाजिक अंतर न पाळल्याने आणि सॅनिटाईजरचा वापर न केल्यामुळे करोनाचा मोठा प्रादुर्भाव होत असुन यात वृध्द व बालकांना संसर्ग होऊ लागल्याचे दिसुन आले आहे.

शहरात करोना बाधीतांचे प्रतिदिन वेग हा जुलै महिन्यात १५० ते १७५ पर्यत पोहचला असुन सरासरी दररोज ५ जणांचा मृत्यू होऊ लागला आहे.६ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत केवळ ९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर जुन महिन्याच्या तीस दिवसात ९६ जणांचा करोनाने मृत्यू झाला. आता सुरु असलेल्या जुलै महिन्यात केवळ बारा दिवसात ६४ करोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. दिवसेदिवसमृत्यूचा आलेख वाढत असल्याने महापालिकेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.

.

शहरातील करोना मृत्यू स्थिती

१ जुलै २

२ जुलै ६

३ जुलै ९

४ जुलै ५

५ जुलै ५

६ जुलै ५

७ जुलै ६

८ जुलै २

९ जुलै ४

१० जुलै ५

११ जुलै 11

१२ जुलै 4

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com