Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना संपत नाही तोच बर्ड फ्लूचे संकट

करोना संपत नाही तोच बर्ड फ्लूचे संकट

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या (corona) पहिल्या, दुसर्‍या लाटेतून सावरत तिसरी लाट न आल्याने शेतकर्‍यांमध्ये (farmers) समाधानाचे वातावरण असतानाच आता शेजारच्या ठाणे (thane) ,नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird flu) आजाराचा शिरकाव झाल्याने शेतकर्‍यांचे (farmres) विशेषतः पोल्ट्रीधारकांचे (poultry owners) तोंडचे पाणी पळाले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही (nashik district) याची खबरदारी घेतली जाते आहे. जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry) जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीधारकांना या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे (Bird flu) कोठेही कोंबड्या (Hens) मृत पावल्या नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे (District Animal Husbandry Officer Dr. Vishnu roars) यांनी सांगितले.

नवापूर (navapur) (जि. नंदूरबार), शहापूर (shahapur) (जि. ठाणे) येथील पोल्ट्रीमधील शेकडो कोंबड्याना (chickens) बर्ड फ्लू आजाराची लागण झाल्याने त्या मृत पावल्या आहेत. या सर्व मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला शहापूर जवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने नाशिक जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीधारक यांच्यासोबत संवाद साधत बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्रीधारक यांनी आता इतर भागातून पक्षी पोल्ट्रीफार्ममध्ये आणू नये,

त्याप्रमाणे ज्याठिकाणी कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्या भागासह आजूबाजूचा परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच कोंबड्यांचे खाद्य पुरविणारी वाहने थेट पोल्ट्रीमध्ये नेऊ नये, नवीन कुठल्याही लोकांना पोल्ट्रीफार्ममध्ये प्रवेश देऊ नये, पशुंची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी,अशा सूचना पोल्ट्रीचालक यांना करण्यात आल्या आहेत.

पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने जिल्ह्यात मोठ्या संख्येने पोल्ट्री फार्म आहेत. जिल्ह्यात सुमारे दहा लाख कोंबड्या ह्या लेयर (अंड्यावरच्या) तर सुमारे एक ते सव्वा कोटी ब्रायलर आहेत,अशी माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या